नवी मुंबई सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात नवी मुंबई ः श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचा शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. पुढील 10 दिवस नवी मुंबईकरांना विविध कार्यक्रमाची ही मेजवानी येथे मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर व माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सदर महोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी नगरसेवक सुनील पाटील, दीपक पवार, निलेश म्हात्रे तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिक उपस्थित होते.
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView